मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ( Assembly Election ) साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - ६१.९५टक्के, अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती - ५८.४८ टक्के, औरंगाबाद - ६०.८३ टक्के,
बीड - ६०.६२ टक्के,
भंडारा - ६५.८८ टक्के,
बुलढाणा - ६२.८४ टक्के, चंद्रपूर - ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के, गडचिरोली- ६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली - ६१.१८ टक्के,
जळगाव - ५४.६९ टक्के, जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के, लातूर - ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर - ५१.७६ टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के, नांदेड - ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के, नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के, पुणे - ५४.०९ टक्के,
रायगड - ६१.०१ टक्के, रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के, सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के, वर्धा - ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के, यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.