बरहानपूर : मध्य प्रदेशातील बरहानपूर जिल्हयातील एका व्यासपीठावर जातीय ताण-तणाव पसरला. हिंदूंच्या बाबा नवनाथांच्या समाधीला कट्टरपंथींनी तो दर्गा असल्याचे सांगत लाठीहल्ला करत दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी सुरू असलेला गोंधळ शांत करत परिस्थिती हताळण्याचे काम केले. हे प्रकरण सोमवारी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी घडल्याचे वृत्त आहे.
पोलीस दोन्ही पक्षांना शांततेने हे प्रकरण सोडवण्याचे आवाहन करत होते. यावेळी वातावऱण तणावपूर्ण आहे. यावेळी सुरू असलेली बैठक अनिर्णित तर राहिलीच, पण प्रशासनासमोर दोन्ही पक्ष एकमेकांसमोर भिडले आहेत. हिंदू पक्षाने कट्टरपंथींयांनी दगडफेक करण्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला असून त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या वादात दोन्ही बाजूचे एकूण ४ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी होते. याप्रकरणात आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यावरून ओळख पटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.