दादर येथील सावरकर स्मारकात रंगणार ११ वा साधना संगीत सोहळा

    20-Nov-2024
Total Views |

sangit 
 
मुंबई : अय्यर फाउंडेशनच्या वतीने ११ व्या 'साधना' संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वीर सावरकर सभागृहा हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या महिला संगीतकार, वादक आणि नृत्यांगना यांच्या सन्मानाकरिता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सन्मान सोहळ्यासोबतच या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिला कलाकार आपली कलाा सादर करणार आहेत. चेन्नई येथील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती श्रीनिवासन त्यांची नृत्यकला सादर करणार आहेत. धारवाडमधील वीणा मठ व्हायलीनवर भारतीय संगीताची चाल धरणार आहेत. प्रसिद्ध गायिका दीपिका भिडे-भागवत आणि ऋतुजा लाड यांच्या सुमधुर आवाजाची जुगलबंदी या संगीत सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे. या सर्व कलाकारांना सिद्दार्थ मेस्ता हार्मोनियम तर स्वप्नील भिसे आणि निस्सार हुसेन खान तबल्याद्वारे सांगितिक साथ साथ देतील.
 
अय्यर फाउंडेशन तर्फे २०१३ सालापासून महिला कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा यासाठी दरवर्षी साधना संगीत सोहळ्याचे आयोजन केले जाते. महिला कलाकारांचा संगीत क्षेत्रातील वावर द्विगुणित व्हावा, या उद्देशाखातर आयोजित केलेला हा दिमाखदार संगीत सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.