विनोद तावडेंवर ट्विट, सुप्रिया सुळेंच्या 'बिटकॉईन घोटाळ्या'वर पत्रकार मूग गिळून गप्प

ज्येष्ठ पत्रकाराची पुन्हा एकदा एककल्ली भूमिका

    20-Nov-2024
Total Views |
 

Supriya Sule 
 
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर दि: १९ नोव्हेंबर रोजी विनोद तावडे यांनी लोकांमध्ये पैसे वाटल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. मात्र त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइनचा आरोप आहे. मात्र त्यांच्यावर ज्येष्ठ पत्रकार यांनी पुन्हा एकदा एककल्ली भूमिका घेत ट्विट केले आहे.
 
मंगळवारी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील पालघर येथे बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण तपासाचा विषय असला तरीही त्यातून त्यांचे निर्माण होणाऱ्या राजकीय संबंधाचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती आहे. 
 
याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार यांनी ट्विट केले की, "भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरारमधील एका हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीने घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे ५ कोटी रुपये बॅग असल्याचा आरोप आहे. यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये बाचाबाची झाली. मते विकत घेतल्यास निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष कशा होतील? @ECISVEEP पुन्हा एकदा चौकशी करून कारवाई करेल की गप्प बसेल?", असे ट्विट केले आहे.
 
 
 
त्यानंतर त्यांनी पुन्हा ट्विट करत लिहिले की, "राज्यात कॅश फॉर व्होट प्रकरणात एकूण तीन एफआऱआय नोंदवण्यात आले होते. दोन एफआरआयमध्ये दोन भाजप उमेदवारांची नावे होती. तसेच बहुजन विकास आघा़डीतील एकाचे नाव आहे. एकूण ९ लाख ५३ हजार ९०० रुपयांची रोकड सापडली. एकूण तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.”
 
 
 
तावडे यांच्यावर आरोप होत असतानाच शरद पवार गटाच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे यांच्यावरही विधानसभा निवडणुकीत बिटकॉईन घोटाळ्याचा पैसा वापरल्याचा आरोप झाला होता. भाजपनेही हा मुद्दा उपस्थित केला.
 
मात्र, सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपांवर संबंधित पत्रकाराने एकही ट्विट केलेले नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. सुळे यांच्या संभाषणाचा एक ऑडिओही समोर आला आहे. या ऑडिओबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्यातील आवाज सुप्रिया सुळे यांचा असून त्यांनी तो आवाज ओळखला आहे.
 
एवढे सगळे होऊनही राजदीप सरदेसाई यांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपांवर एकही ट्विट केले नाही. आता यामागे काय कारण असावे असा प्रश्न मनात येईल. यामागे शरद पवार आणि पत्रकार यांच्या वडिलांचे नाते आहे. राजदीप यांच्या वडिलांवर शरद पवारांचे ऋण आहेत, ज्याची ते आजही परतफेड करत आहेत.