‘तो आवाज तुमचा नाय.’ ज्यांनी तुमच्यावर आरोप केला, त्यांच्यावर तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. हं पण, तुमचे ‘एकच वादा अजितदादा’ तर म्हणाले, “हा आवाज आमच्या तायडीचाच.” ‘एक अकेला देवेंद्र क्या करेगा’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, “आरोप गंभीर आहेत आणि त्याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे.” ताई अहो ताई, हे ‘बिटकॉईन’ काय असते, कसे असते, तुम्ही जरा सांगाल का?
काय म्हणता, ‘तो आवाज तुमचा नाय.’ ज्यांनी तुमच्यावर आरोप केला, त्यांच्यावर तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. हं पण, तुमचे ‘एकच वादा अजितदादा’ तर म्हणाले, “हा आवाज आमच्या तायडीचाच.” ‘एक अकेला देवेंद्र क्या करेगा’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, “आरोप गंभीर आहेत आणि त्याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे.” ताई अहो ताई, हे ‘बिटकॉईन’ काय असते, कसे असते, तुम्ही जरा सांगाल का?
‘क्रिप्टोकरन्सी’ असते असे काही लोकं बोलतात. पण, आम्ही १००च्या नोटा, ५००च्या नोटा आणि मोदींनी नोटबंदी करण्यापूर्वी २०००च्या नोटा पाहिल्या होत्या. जाऊ दे. आमच्या डोक्यावरून जाणार हाय का ते? जाऊ दे, नकाच सांगू.
आमच्या मराठवाड्यातला विदर्भात कितीतरी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. सगळे त्यावर उपाय करायला सरसावले. त्यावेळी आमची खूप आशा होती की, तुम्ही म्हणाल इतके सगळे करण्यापरीस एकरात करोडो रूपयाची वांगी कशी पिकवायची ती मी शिकवीन. जाऊ दे आता ते नाय सांगितलं तर ‘बिटकॉईन’च तरी सांगा. कथित ‘क्रिप्टोकरन्सी’ फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी आरोप केले आहेत म्हणे. त्यांचे म्हणणे की, या घोटाळ्यातील पैसा विधानसभा निवडणुकांसाठी वापरला आहे. आता ते काय म्हणतात ते खरे का खोटे सिद्ध होईलच. पण, काहीही म्हणा मन भरून आले. एकरात करोडो रूपयाची वांगी पिकवता पिकवता ‘बिटकॉईन’ का काय त्याचे पण, उद्योग करायला लागलात ताई. एक डाव आम्हाला विस्कटून सांगा की, काय असते ते. नाय तो ऑडियो ऐकला. आवाज ओळखीचाच हाय म्हणून पुन्हा पुन्हा ऐकला. एकडाव वाटलं महाराष्ट्राची जनता तुम्हाला फकस्त साहेबांची मुलगी म्हणून ओळखतात. त्या जनतेला तुमची ही हुशारी कळलीच नाही. ‘वेष असे बावळा तरी अंतरंगी नाना तर्हा’ असे संत म्हणून गेलेत. अहं नाना म्हणजे ते पटोले नाय बर, तर नानाचा खूप विविध अर्थ होतो. संकष्टीच्या दिवशी हौसेने मटण खाणार्या हा पक्ष माझ्या बापाचा आहे, असे पक्षासाठी रक्ताचे पाणी करणार्या कार्यकर्त्यांना ठणकावणार्या ताई तुमच्यावर ‘बिटकॉईन’चा व्यवहार करतात हे अंतरंग मानून लोक तुमच्यावर आरोप करतील हे माहितीच नव्हते बरं का? ताई आपल्याला तर एकच प्रश्न हाय ‘बिटकॉईन’ म्हणजे काय ओ ताई?
राहुल गांधींचा निषेध!
लिश बहु बायकांत बडबडला’ असे एक जुने वचन आहे. पण, ते जुने आहे आणि ते वचनही काहीसे दोषपूर्ण आहे. कारण, बालिशची बडबड ऐकण्याइतक्या बायका काही मूर्ख नसतात. तसेच बालिश मंदबुद्धींना बायकांसमोर बोलावे का पुरूषांसमोर, याचे ताळतंत्र थोडीच असते. मिळाला माईक की, मारायच्या बोंबा. असे सकाळ- संध्याकाळचे भोंगे महाराष्ट्रात सातत्याने त्यांच्या बेताल अर्थहीन वक्तव्यांचा रतीब घालत असतात. जनतेला त्यांची सवय पडलेली असते. एखाद्या दिवशी हे भोंगे वाजले नाहीत की, लोकांना आश्चर्य वाटते. कारण, हे भोंगे काहीतरी बडबडावेत म्हणूनच तर सूर्यदेव दररोज सकाळ करतो असेही आताशा लोकांना वाटू लागले आहे.
आता हे सगळे इतके लिहिण्याचे कारण काय? तर काँग्रेसचे राजकुमार पुन्हा काहीतरी म्हणालेत. अनेक लोक म्हणतात की, ते संंदर्भहीन बोलतात. पण, ‘भगवा दहशतवाद’, ‘मंदिर में लोग लडकीयों को छेडने जाते हैं’ वगैरे वगैरे हिंदूविरोधी विधाने करताना मात्र बोलताना ते चुकत नाहीत. तर असे हे ‘मोहब्बत की दुकान’ असणारे राहुल नुकतेच महाराष्ट्रात म्हणाले की, “पत्रकारांना मालकाचे ऐकावे लागते, ते मनासारखे काम करू शकत नाहीत. एका तर्हेने ते गुलाम आहेत.” लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल इतके द्वेषपूर्ण आणि निंदनीय विधान करणार्या राहुल गांधी यांना महाराष्ट्रातील ‘निर्भय बनो’ वगैरे वगैरे नौटंकीमध्ये सामील झालेल्या आणि स्वत:ला पत्रकार वगैरे समजणार्या लोकांनी जाब विचारला का? तसेच पत्रकार हे गुलाम असतात, असे राहुल गांधी यांना का वाटत असेल? नाही, हा वारसा त्यांच्याकडे खानदानी असावा. कारण, त्यांच्या आजींनी इंदिरा गांधी यांनी संविधानाला डावलून देशावर आणीबाणी लादली. त्यावेळी काँग्रेसच्या सत्ताकाळात राहुल गांधींच्या पूर्वजांमुळे खरे तर ’संविधान खतरे’मध्ये होते. त्यावेळी आणीबाणी म्हणजे पत्रकारितेचा वसा घेतलेल्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनप्रबोधन, राष्ट्रहित साधू पाहणार्या पत्रकारांना त्यांच्या कर्तव्यापासून वंचित करण्याचा एककलमी कार्यक्रमच होता. ती खरी पत्रकारांसाठी गुलामी होती. तर हे सगळे आठवूनच का राहुल गांधी पत्रकारांना ‘गुलाम’ म्हणालेत. राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा थोडाच.