देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा झंझावात; राज्यात ६४ सभा

    19-Nov-2024
Total Views |
Devendra Fadanvis

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराचा झंझावात केला. एकूण ६४ ठिकाणी त्यांच्या रॅली, रोड शो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या ५० वर सभा त्यांनी अवघ्या १३ दिवसांत केल्या. म्हणजे सरासरी चार सभा त्यांनी दररोज घेतल्या. सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये त्यांनी शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.

हा प्रवास त्यांनी २५ पेक्षा अधिक जिल्ह्यात केला असून, उर्वरित जिल्ह्यांत व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधीत्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. शेतकर्‍यांना मोफत वीज, दिवसा वीज, सौर कृषीपंप, एक रुपयात पीकविमा, यासह सरकार येताच शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यात येईल ‘किसान सन्मान निधी’ १२ हजारावरून १५ हजार करणार, एमएसपीवर ‘भावांतर योजना’ लागू करुन सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देणार, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा, असे अनेक मुद्दे मांडले. ‘लाडकी बहीण’, ‘लेक लाडकी’, ‘अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास’, ‘तीन मोफत सिलेंडर’, ‘मुलींना मोफत उच्च शिक्षण’, ‘लखपती दिदी’ या महिलांसाठीच्या योजना त्यांनी भाषणातून मांडल्या. लाडक्या बहिणींना आता दीड हजारऐवजी २ हजार, १०० रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच स्थानिक सिंचनाचे प्रकल्प, उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला.

नितीन गडकरी यांच्या ७२ जाहीर सभा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अवघ्या १३ दिवसांत महाराष्ट्रभर महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ एकूण ७२ जाहीर सभा आणि रोड शो केले. ज्यात दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी शेवटच्या दिवशी चार जाहीर सभांचा समावेश आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

जाहीर सभा - २७
गाव भेटी - ११०
कामठी - मौदा मतदारसंघात - ५८ सभा
बाईक रॅली - १३