पालघर : विधानसभा निवडणूकीला अवघे काही तास शिल्लक असताना पालघरमध्ये राजकीय समीकरण बदलले आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेळ केला आहे. तसेच त्यांनी डहाणू येथील भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांना आपला पाठिंबाही जाहीर केला आहे.
"मते खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या नेत्याला निवडून दिल्यास गेल्या पाच वर्षांपासून खुंटलेला आमच्या ग्रामीण पट्ट्याचा विकास जलद गतीने होईल, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी विनोद मेढा यांना पाठिंबा देत आहे," अशी प्रतिक्रिया सुरेश पाडवी यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर दिली.
हे वाचलंत का? - विनोद तावडेंवर आरोप करून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न!
सुरेश पाडवी हे बहुजन विकास आघाडीच्या पालघर उपाध्यक्ष पदावर होते. दरम्यान, त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधी माघार घेत त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता डहाणूमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.