मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसच्या महिलाविरोधी धोरणाचा आणखी एक नमुना उघड झाल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये अमित देशमुखांनी भाजपच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा आर्ची असा उल्लेख केला आहे.
हे वाचलंत का? - भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला!
चित्रा वाघ म्हणाल्या की, "लाडकी बहिणविरोधात याचिका, माल, बकरीसारखे शब्द वापरल्यावर काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना पुढे आला आहे. काँग्रेसचे लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांनी भाजपच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरले आहेत. हेच आहे का काँग्रेसचे महिलांविषयी धोरण? महिलांचा सन्मान करता येत नसेल तर अपमान करू नका. तुमच्या अहंकारी आणि मग्रुरीच्या भाषेला जनता मतदानातून नक्की प्रत्युत्तर देईल. महिलाओं के अवमान में काँग्रेस मैदान में," अशी टीका त्यांनी केली आहे.