सहृदयी जेन

19 Nov 2024 19:23:59
Dr. Jane goodall Mumbai Visit


सहृदय असणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत
. माणसे वयाने मोठी होत गेल्यावर ती कालबाह्य होतात. परंतु, डॉ. जेन गुडाल याला अपवाद आहेत. बदलत्या काळाशी सुसंगत होऊन त्याप्रमाणे वैचारिक ठेवण मांडणार्‍या तत्त्वज्ञ म्हणून जेन ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनाचा आणि मुंबई भेटीचा घेतलेला हा आढावा...(Dr. Jane goodall Mumbai Visit)


"वातावरणीय बदलांमुळे जगासमोर निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन हे ‘इंटेलिजन्स’ वापरून नाही, तर ‘इंटेले्नच्ङ्मुअल’ दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे,’’ असे मत ज्ङ्मेष्ठ वन्यजीव संवर्धक, संशोधक आणि ‘संयुक्त राष्ट्र परिषदे’च्या शांतिदूत डॉ. जेन गुडाल यांनी मांडले (Dr. Jane goodall Mumbai Visit). त्या शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘ओशन लिस्ट्रसी डायलॉग’ या कार्यक्रमात बोलत होत्या (Dr. Jane goodall Mumbai Visit). स्मित चेहरा, साधी बोली आणि वलय निर्माण करणारी देहबोली, असे काहीसे गुडाल यांचे व्यक्तिमत्त्व मुंबईकरांना अनुभवता आले. वय वर्षे ९० असूनदेखील न थकता, तासभर त्यांनी केलेले भाषण आणि वातावरणीय बदलांवर मांडलेले निरसनवादी मत ऐकून उपस्थित मंडळी हेलावून गेली होती. (Dr. Jane goodall Mumbai Visit)
 
 
गेल्या काही वर्षात पर्यावरणीय चळवळींना विद्रोहाचे रुप मिळाले आहे. पर्यावरणीय समस्यांची उकल ही विद्रोहातूनच होऊ शकते, असे भासवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. अशा परिस्थितीत गुडाल यांनी अत्यंत शांतपणे, सामंजस्याने पर्यावरणीय समस्यांची उकल ही निसरनवादी दृष्टिकोन ठेवूनच होऊ शकते, असे ठासवून सांगितले. गुडाल या ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत पाच दिवसीय मुंबई दौर्‍यावर आल्या आहेत.
 
 
डॉ. जेन गुडाल या ज्येष्ठ वन्यजीव संशोधिका असून ‘प्रायमेट’ म्हणजेच वानर कुळातील प्राण्यांवर केलेल्या अभ्यासासाठी प्रसिद्ध आहेत. विशेष करून आफ्रिकेत चिम्पांझीविषयी केलेल्या संवर्धन आणि संशोधनकार्यासाठी त्या जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी टांझानियात जाऊन चिम्पांझीविषयी केलेल्या संशोधनामुळे वानरविज्ञानात क्रांतिकारक भर पडली. चिम्पांझी वेगवेगळी साधने बनवू शकतात आणि त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व असते, याचा उलगडा गुडाल यांनी केला. चिम्पांझी झाडाच्या छोट्या फांदीचा हत्यार म्हणून उपयोग करतात. जेन यांच्या संशोधनाने ‘हत्यार वापरणारा आणि बनवणारा प्राणी म्हणजे माणूस,’ ही माणसाची व्याख्या अपुरी आणि संदिग्ध ठरली. वारुळात डहाळी अलगद खुपसून त्यावरील मुंग्या खाण्याची युक्ती लहान चिम्पांझी हे मोठ्या चिम्पांझींचे निरीक्षण करून शिकतात, याचा उलगडा त्यांनी केला. या प्राण्यांच्या बुद्धिमत्तेबाबत गुडाल यांच्या इतके संशोधन कोणी केलेले नाही. २०२२ साली ‘संयुक्त राष्ट्र परिषदे’ने त्यांच्या नावाची घोषणा शांतिदूत म्हणून केली. ९० वर्षीय गुडाल या दि. १६ नोव्हेंबरपासून मुंबई दौर्‍यावर आल्या आहेत. दि. २० नोव्हेंबरपर्यंत त्या मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी सार्वजनिक सभांमध्ये मार्गदर्शन करणार असून काही ठिकाणी भेटदेखील देणार आहेत. ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट-इंडिया’ने शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘ओशन लिस्ट्रसी डायलॉग’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला जीवनकाळ उलगडला. ‘‘मी १९५७ साली केनियामध्ये गेले होते. परंतु, केनियाला जाण्यासाठी मी बराच संघर्ष केला. त्याकाळी विमानप्रवास हा जहाज प्रवासापेक्षा फार खर्चिक होता. केनियाच्या प्रवासाकरिता पैसे गोळा करण्यासाठी मी एका उपहारगृहात वर्षभर मदतनीस म्हणून काम केले. केनियात मला प्राणिसृष्टीची पहिल्यांदाच ओळख झाली. जंगलतोडीमुळे तिथल्या चिम्पांझींची संख्या कमी होत असल्याचे माझ्या लक्षात आहे. लुई लिकी यांच्या सांगण्यावरून मी १९६० साली या प्राण्यावर संशोधनाचे काम सुरू केले,’’ असे गुडाल यांनी सांगितले.
 
 
‘‘सध्या जगासमोर अनेक पर्यावरणीय समस्या आहेत. त्या वातावरणीय बदलांमुळे निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांविषयी केवळ बोलण्यापेक्षा त्यांवर उपाय सुचविणे आवश्यक आहे. माणूस ‘इंटेलिजन्ट’ आहे. परंतु, चिम्पांझी हा ‘इंटेले्नच्ङ्मुअल’ आहे. त्यामुळे माणसांनी जगासमोर उभ्या असणार्‍या समस्यांचे निसरन हे ‘इंटेलिजन्स’ वापरून नाही, तर ‘इंटेले्नच्ङ्मुअल’ दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन गुडाल यांनी केले. ‘‘केनियाच्या प्रवासादरम्यान मला समुद्राचे विराट दर्शन झाले. आजवर ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट’ला जंगलासंबंधी केलेल्या कामासाठी ओळखले जाते. परंतु, आता आम्ही समुद्रासंबंधी कामाला सुरुवात केली असून ‘ओशन लिस्ट्रसी डायलॉग-इंडिया’ हा त्यामधीच एक भाग आहे,’’ अशी माहिती गुडाल यांनी दिली.
 
 
मैत्रीपूर्ण वर्तन
चिम्पांझी पूर्णतः शाकाहारी असतात, असा पूर्वी समज होता. परंतु, ते कीटक खातात. एवढेच नाही, तर ’कोलोबस’ जातीची छोटी माकडे आणि इतर छोटे प्राणी संगनमताने कोंडी करून शिकार करून खातात, असे जेन यांच्या निरीक्षणामुळे समजले. चिम्पांझींच्या गटात शारीरिक ताकदीप्रमाणेच आवाज मोठा असणे महत्त्वाचे असते. कारण, शत्रूला पळवून लावण्यास मोठा आवाज उपयोगी पडतो. ‘डेव्हिड’ नावाच्या लहानशा चिम्पांझीचा आकार आणि आवाजही लहान होता. एकदा त्याला जेनच्या तंबूत बिस्किटांचा पत्र्याचा रिकामा डबा सापडला. तो घेऊन डेव्हिड बाहेर पळाला. डब्यावर हाताने ठोकत, उतारावर डबा घरंगळवत धावू लागला. स्वतःबरोबर सतत डबा बाळगणे आणि जंगलात घुमत राहील असा आवाज करत राहणे, यांमुळे त्याला गटात पदोन्नती मिळाली. आता तो अधिकारक्रमात अव्वल गणला जाऊ लागला. डबा फुटून त्यातून घनगंभीर आवाज येणे बंद होईपर्यंत डेव्हिडचा अव्वल क्रमांक टिकला. नंतर मात्र त्याला पदावनती स्वीकारावी लागली. जेन या मानव असूनही गोम्बीतील चिम्पांझींनी त्यांचा स्वतःच्या टोळीत समावेश केला होता. सुमारे दोन वर्षे जेन एका टोळीतील सर्वांत शेवटच्या क्रमांकावरच्या अतिदुबळ्या चिम्पांझी-सदस्या होत्या.
व्यक्तिमत्त्व म्हणून अभ्यास
चिम्पांझींचा व्यक्ती म्हणून जेन यांनी अभ्यास केला. दोन प्रौढ व्यक्तींचे एकमेकांशी, आई आणि मुलाचे, भावंडांचे आपसांत, प्रौढ व्यक्तींचे गटात-सामाजिक वर्तन, चिम्पांझींच्या दोन गटांचे जमिनी क्षेत्रावर मालकी अधिकार राखतानाचे वर्तन अशा बाबींचे निरीक्षण आणि नोंदी जेन यांनी ठेवल्या. चाणाक्ष डेव्हिड, कपटी माईक, धीट गटप्रमुख गोलिथ, दांडगा हम्फ्रे, माणसाच्या मुलांवर माया करणारी गिगी मावशी, फ्लो माता आणि तिची मुले-फिगन, फेबन, फ्रॉइड, फिफी, आणि फ्लिटं, जेन यांना टोळीतून हाकलून काढणारा फ्रोडो या चिम्पांझींचे वर्णन जेन यांनी केले आहे. जेन यांची हजारो टिप्पणे ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’ने अभ्यासकांसाठी जपून ठेवली आहेत.
Powered By Sangraha 9.0