अनिल देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज!

    19-Nov-2024
Total Views |
 
Anil Deshmukh
 
नागपूर : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सोमवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
हे वाचलंत का? -  पालघरमध्ये बविआला मोठा धक्का! डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजपमध्ये प्रवेश
 
अनिल देशमुख यांना सुरुवातीला काटोल येथे तर त्यानंतर नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनिल देशमुख म्हणाले, "मी भाजपला सांगू इच्छितो की, तुम्ही अनिल देशमुखांना दगड मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही. आम्ही तुम्हाला सोडणारसुद्धा नाही," असे ते म्हणाले.