शिल्पकार दिनकर शं. थोपटे यांच्या ‘शिल्पसाधना’ पुस्तकाचे प्रकाशन

    18-Nov-2024
Total Views |

d s thopte

 पुणे : शिल्पकार दिनकर शं. थोपटे कलागौरव समिती तर्फे ज्येष्ठ शिल्पकार प्रा. दिनकर शं. थोपटे यांच्या ‘शिल्पसाधना’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार २० नोंव्हेबर रोजी सायंकाळी ६ ते ८:३० या वेळेत ‘राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, शिवाजीनगर, पुणे’ येथे आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते ‘शिल्पसाधना’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यंगकवी आणि लेखक रामदास फुटाणे व ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे उपस्थित राहणार आहेत. सोबतच डॉ. पंकज भांबुरकर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘कालिदासीय साहित्य आणि दृश्यकला या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. शिल्पकार दिनकर शं. थोपटे यांच्या महाकवी कालिदास रचित वाङमयावर आधारित चित्रांचे प्रदर्शन सुद्धा यानिमित्ताने भरणार आहे. बुधवार २० नोंव्हेबर ते २४ नोव्हेंबेर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजता हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.