महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुस्लिमांना आरक्षण देणार : रेवंथ रेड्डी

18 Nov 2024 14:30:51

REDDY
 
( Image Source : ANI )
 
मुंबई : (Revanth Reddy) "जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर मुस्लिमांना ५% आरक्षण लागू करणार का?" असा प्रश्न विचारल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, "सरकार (महाराष्ट्रात) स्थापन केल्यानंतर विधानसभेत आम्ही त्यावर (मुस्लिम आरक्षण) चर्चा करू. तेलंगणामध्ये ४% आरक्षण लागू आहे, आधी ५% दिले होते पण सुप्रीम कोर्टाने आरक्षण ५१% हून अधिक होत असल्याने ते कमी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाने जेव्हा वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री होते आणि तत्कालीन यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंध्रप्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्यात ४% आरक्षण लागू केले होते," असे त्यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
 
"तेलंगणामध्ये परवा ११,००० पदांसाठी शिक्षक भरती घेण्यात आली होती त्यांपैकी ७२० मुस्लिम उमेदवारांना या आरक्षणाखाली भरती करण्यात आले जे गरीब आहेत आणि जे गरजू आहेत, त्यांना न्याय देण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे." असेही पुढे ते म्हणाले.
 
 
 
 
 
अमित शाहांची मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दयावरुन मविआवर टीका
 
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगाव येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना म्हणाले होते की, ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. आणि म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना १०% आरक्षण देण्याची घोषणा देखील केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही ५०% पेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला होता.
 
Powered By Sangraha 9.0