या वर्षीचा ‘शिरीष पै पुरस्कार’ कवियत्री-लेखिका उषा मेहता यांना प्रदान

    18-Nov-2024
Total Views |
 
usha mehta
 
मुंबई : या वर्षीचा ‘शिरीष पै पुरस्कार’ कवयित्री आणि लेखिका उषा मेहता यांना प्रदान करण्यात आला. शिरीष पै यांची जयंती आणि दैनिक मराठा यांचा वर्धापनदिनाचे औचित्य साधून १५ नोव्हेंबर रोजी अमर हिंद मंडळ दादर पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रकाशक आणि अभ्यासक रामदास भटकळ यांच्या शुभहस्ते उषा मेहता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डिंपल पब्लिकेशन प्रकाशित शिरीष पै लिखित "शिरीष -रंग" या ललितलेख संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश म्हात्रे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, कवयित्री नीरजा, कवयित्री सिसिलिया कार्व्हालो, संपादक अरुण शेवते,अशोक मुळे आणि विधिज्ञ राजेंद्र पै यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उषा मेहता यांनी शिरीष पै यांच्या मैत्रीचा उल्लेख करून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला अरुण म्हात्रे, मोनिका गजेंद्रगडकर, अचला जोशी, जयराज साळगावकर, अशोक हांडे, विवेक मेहेत्रे, उदयदादा लाड, संजय भिडे, मेघना साने आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राजेंद्र पै यांनी केले. साहित्य प्रेमी मंडळींच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.