जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार!

18 Nov 2024 12:03:33
 
Jalgaon
 
जळगाव : जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार झाल्याची माहिती पुढे आली आहे. अहमद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे. सोमवारी पहाटे ते झोपले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर ३ राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडलाय! चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
 
विधानसभा निवडणूकीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत सर्वच पक्षांच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. मात्र, अशातच जळगावमध्ये एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अहमद हुसैन शेख हे झोपेत असताना हा गोळीबार झाला. दरम्यान, हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0