व्होट जिहाद करणारा नोमानी अडचणीत! निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल

16 Nov 2024 16:46:11

ec
 
मुंबई : (Kirit Somaiya) सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
 
द्वेषयुक्त भाषणातून मुस्लिमांच्या धार्मिक भावना भडकवणे, मुसलमानांनी भाजपचे समर्थन केल्यास त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे, व्होट जिहादचे आवाहन करणे अश्या प्रवृत्तींना दुजोरा देत असल्याचा आरोप करत किरीट सोमैयांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.
 
यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत किरीट सोमैयांनी माहिती दिली आहे. पोस्टमध्ये सांगितल्यानुसार, मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे जी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्याला चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले असून व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २४ तासात या कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे, असे किरीट सोमैयांनी स्पष्ट केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0