मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने चित्रपटगृहात दोन मोठे चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाले होते. यात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ आणि अनीस बाझमी दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं. मुळात या दोन्ही चित्रपटांचे आधीचे भाग सुपरहिट होतेच आणि त्यात यांचीही कामगिरी तशी पाहायला गेल्यास बरी ठरली. सध्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली त्याची आकडेवारी समोर आली असून यात कार्तिकने अजयला मागे टाकले आहे. शिवाय, १४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कंगुवा’ या चित्रपटाचीही कमाई समोर आली आहे. जाणून घेऊयात कोणत्या चित्रपटाने कितीचा गल्ला जमवला.
‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४३.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३७.३७ कोटी, चौथ्या दिवशी १८ कोटी, पाचव्या दिवशी १४ कोटी, सहाव्या दिवशी १०.५ कोटी, सातव्या दिवशी ८.७५ कोटी कमवून आत्तापर्यंत एकूण १७३ कोटींची कमाई केली आहे.
‘भूल भूलैय्या ३’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.५ कोटी, चौथ्या दिवशी १८ कोटी, पाचव्या दिवशी १४ कोटी, सहाव्या दिवशी १०.७५ कोटी, सातव्या दिवशी ९.५ कोटी, आठव्या दिवशी ९.२५ कोटी, नवव्या दिवशी १५.५ कोटी, दहाव्या दिवशी १६ कोटी, अकराव्या दिवशी ५ कोटी, बाराव्या दिवशी ४.२५ कोटी, तेराव्या दिवशी ३.८५ कोटी, चौदाव्या दिवशी ४.१५ कोटी, पंधराव्या दिवशी ४ कोटी कमवून आत्तापर्यंत एकूण २२०.२५ कोटी कमावले आहेत.
तर, ‘कंगुवा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी तमिळ भाषेत १४.९ कोटी, हिंदी ३.५ कोटी, तेलूगू ५.५ कोटी, कन्नड ०.०३ कोटी, मल्याळम ०.०७ कोटी कमवत एकूण २४ कोटी, दुसऱ्या दिवशी तमिळ भाषेत ३.२४ कोटी, हिंदी २.४९, तेलूगू १.७ कोटू कमवत एकूण ७.४३ कोटी, तिसऱ्या दिवशी ०.७६ कोटी कमवत आत्तापर्यंत ३२.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.
तिनही चित्रपटांची एकूण आकडेवारी पाहता ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा कमाईच्या बाबतीत उतरता आलेख दिसला तर ‘भूल भूलैय्या’ चित्रपटाने चढत्या क्रमात कमाई करत नवा विक्रम केला. रोहित शेट्टीच्या चित्रपटांनी आजपर्यंत तुफान कमाई केली आहे पण सिंघम अगेन हा चित्रपट अनेक बाबतीत सरस असूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण करु शकला नाही असं चित्र आकडेवारीतून दिसत आहे. तर, ‘कंगुवा’ या चित्रपटानेही जितका भव्य असल्याचे आश्वासन दिले होते ते कुठेतरी पुर्ण न केल्याचेही दिसत आहे.