नवी दिल्ली : मुस्लिम समाजाचे गुरू मुफ्ती तारिक मसूद (Mufti Tariq Masood) यांनी आपल्याच मुस्लिम धर्माबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत त्यांनी आपल्या मुस्लिम धर्माच्या विवाह पद्धतीवर भाष्य केले आहे. त्यांनी संबंधित व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, आमच्या मुस्लिम समुदायात एकाचवेळी काकी आणि आपल्या पुतणीसोबत नातेसंबंध ठेवण्याची मुभा असते.
मौलवी मसूद यांचा हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये काहीही एक गैर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुन्नी इस्लामचे धर्मोपदेशक म्हणून मुफ्ती तारिक मसूद यांची ओळख आहे. त्यांच्या या व्हिडिओकडे अनेकांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
याप्रकरणाचा व्हिडिओ क्रियेटली डॉट इन या 'X' ट्विटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ १६ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याआधीही मुफ्ती तारिक मसूद यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.