सुशांतची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली; प्रतिक बब्बरने उल्लेख केला ‘त्या’ स्वप्नाचा

16 Nov 2024 10:25:39

sushant singh rajput 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील शांत आणि गुणी अभिनेता अशी ओळख मिळवणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने फार लवकरच या जगाचजा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूला चाडेचार वर्ष उलटून गेली असली तरी अजूनही त्याच्या आठवणींमध्ये हरवले आहेत. एकीकडे त्याचे चाहते त्याच्या आठवणीनं व्याकूळ होत आहेत, तर दुसरीकडे अनेक चाहते त्याला न्याय मिळावा देण्याची मागणीही करत आहेत. या दरम्यान, आता अभिनेता प्रतिक बब्बर याने सुशांत सिंगबाबत खुलासा केला आहे. प्रतिकने सुशांतसोबत २०१९ मध्ये 'छिछोरे' या चित्रपटात काम केलं होतं.
 
प्रतिक बब्बर हा सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. प्रतिकने 'फिल्म ग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत सुशांतची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती होती ते सांगितलं. प्रतिकने सुशांतच्या शेवटच्या इच्छेबाबत सर्वांना सांगितलं. 'छिछोरे'च्या शुटिंगनंतर सुशांतनं एकट्यानं अंटार्क्टिकाला जाण्याची चर्चा माझ्यासोबत केली होती. प्रतिक बब्बर सुशांतच्या फार जवळ नव्हता, पण जेव्हा दोघे बास्केटबॉल सीन शूट करण्यासाठी थांबले होते, त्यावेळी दोघांमध्ये बोलणं झाल्याचं सांगितलं होतं.
 
प्रतिक पुढे म्हणाला की की, “सुशांत थोडा वेगळा होता. तो म्हणाला होता, 'यार, शूटिंग संपल्यावर मी अंटार्क्टिकाला जाणार आहे. पण त्याची ती इच्छा शेवटी अपूर्णच राहिली”. २०१९ मध्ये सुशांतनं सोशल मीडियावर त्याच्या ५० स्वप्नांची यादी शेअर केली होती. यामध्ये त्यानं विमान उडवणं, डाव्या हातानं क्रिकेट मॅच खेळणं आणि मुलांना अवकाशाविषयी शिकवण्याच्या स्वप्नांचा उल्लेख त्यानं केला होता. पण दुर्दैवं म्हणजे, सुशांतला ५० पैकी केवळ १३ स्वप्न पूर्ण करता आली. आणि आपली स्वप्न अर्ध्यातच सोडून सुशांत सिंह राजपूतनं या जगाचा निरोप घेतला.
Powered By Sangraha 9.0