शाहरुख खानसोबत तुलना झाल्यावर विक्रांत मेस्सी म्हणतो; "तो ३५ वर्षांपासून..."

16 Nov 2024 12:59:37
 
vikrant messy
 
 
मुंबई : विक्रांत मेस्सी अभिनित 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित १२वी फेल या चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत होताच. शिवाय यंदाच्या इफ्फी २०२४ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवला जाणार आहे. दरम्यान, एकीकडी त्याच्या चित्रपटांची जोरदार चर्चा सुरु असून दुसरीकडे त्याची तुलना थेट शाहरुख खान सोबत करण्यात आली. यावर आता विक्रांतने उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, “शाहरुखसोबत तुलना होणं योग्य नाही”.
 
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मेस्सी म्हणाला की, "ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्याने कोणी मला ही कॉम्प्लिमेंट दिली आहे तो हे ऐकत असेल तर मला त्याचे वैयक्तिकरित्या आभार मानायचे आहेत. पण ही खूपच मोठी गोष्ट आहे. हे असं ऐकलं की चांगलं वाटतं. पण शाहरुख इंडस्ट्रीत ३५ वर्षांपासून काम करत आहे आणि मला तर आता कुठे १०-१२ वर्ष झाली आहेत. त्यांच्याशी तुलना होणं हे त्यांच्यासाठी अनफेअर आहे. पण मला खरंच खूप सम्मानित वाटत आहे."
Powered By Sangraha 9.0