बक्सर : बिहारमध्ये बक्सर येथे हिंदूंचे मोठ्या प्रामाणावर ख्रिश्चन धर्मांतरण झाल्याची घटना घडली आहे. ५० ते ६० हिंदू स्री-पुरूषांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांना गंगेत अंघोळ केल्यावर पुजारी त्यांच्या आग्रहानुसार सिंदूर लावतात. मात्र आता त्यांच्या भांगेत ख्रिस्ती धर्माचे क्रॉस लावण्यात आले. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला. याप्रकरणात पुजाऱ्यांना अटक केली. हे प्रकरण गुरूवारी १४ नोव्हेंबर २०२४ सिमरी पोलीस ठाण्याच्या नागपुरा गावातील महावीर गंगा घाटावर उघडकीस आले.
यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांनी माहिती दिली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रमुख कमलनयन पांडे यांच्यासह पोलीस पथक गंगा घाटावर पोहोचले होते. यावेळी पोलिसांना पाहताच धर्मांतरण करणाऱ्या तीन पुजाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. धर्मांतराच्या माहितीवरून गंगा घाटावरून तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस ठाण्याचे प्रमुख म्हणाले आहेत.
महिलांच्या भांगेतील कुंकू पुसण्यात आले, हिंदू धर्मात मोठे महत्त्व असलेल्या महिलांचे सिंदूर पुसून त्यांचे धर्मांतरण करण्यात येणार असल्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
समुहेल, राजू मसिह आणि रवी रंजन राम हे गंगा घाटावर वंचित वर्गातील हिंदू महिलांना भूत-प्रेतवादाचा हवाला देऊन धर्मातरित करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. काही लोकांनी त्याला विरोध केल्यावर त्याने शिवीगाळ केली आणि बाचाबाचीही झाली होती. याप्रकऱणात लेखी तक्रारीच्या कारवाईवरून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले आहेत. याप्रकरणी महिलांच्या धर्मांतरावर वरिष्ठांच्या सूचनेवरून कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आले आहे.