मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन विभागाने कल्याणमधील पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती (kalyan exotic animal). या छाप्यामधून काही देशी प्राण्यांसह ओरॅंगोटॅनसारख्या विदेशी प्राणी ताब्यात घेतले होते (kalyan exotic animal). या घटनेतील आरोपी अजूनही फरार असून वन विभागाचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत (kalyan exotic animal). मात्र, यानिमित्ताने कल्याण, ठाणे, मुंब्रा परिसरात चालणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीचे जाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. (kalyan exotic animal)
काही महिन्यांपूर्वी क्राॅफर्ड मार्केट परिसरात छापा टाकून वन विभागाने प्राण्यांची बेकायदा खरेदी-विक्री उघडकीस आणली होती. या प्रकरणाच्या चौकशीमधून कल्याणमध्ये सुरू असणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे शनिवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी ठाणे वनाधिकाऱ्यांनी कल्याण-शिळ फाट्यावरील एक्स्पिरिया मॉलजवळील पलवा सिटीमधील सवरना इमारतीतील एका खोलीवर छापा टाकला. त्यावेळी इमारतीमधील बी विंगमधील आठव्या मजल्यावरील ८०५ क्रमांकाच्या खोलीमध्ये काही विदेशी प्राणी आढळून आले. विदेशी साप, अजगर, कासव, सरडा आणि महत्वाचे म्हणजे ओरॅंगोटॅन या प्रजातीचे माकड वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.
खोलीवर छापा टाकण्यापूर्वीच ही खोली भाड्याने घेतलेला फैजान नामक इसम फरार झाला होता. वन विभाग सध्या त्याचा माग काढत आहे. मात्र, कल्याण, ठाणे आणि मुंब्रा या परिसरात फैजान सारखे अनेक जण विदेशी प्राण्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करत आहेत. मुंब्रामध्ये ही संख्या अधिक आहे. याठिकाणी ओरॅंगोटॅनसह काही विदेशी कासवांचे व्यवहार सर्हास सुरू आहेत. त्यामुळे या परिसरात देखील पुढच्या काळात चौकशीचा ससेमिरा सुरू होणार आहे.