कोविड काळात राजा मैदानात हवा होता पण बंगल्यावर बसून होता!

13 Nov 2024 15:40:27
 
mns
 
ठाणे : (Sharmila Thackeray) ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गोकुळनगर भागात आयोजित केलेल्या प्रचारसभेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी शर्मिला ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
 
यावेळी बोलताना शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, "कोविडकाळात जे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. ते दोन वेळा मंत्रालयात गेले. याबाबत शरद पवार यांनी पुस्तकात लिहिलं आहे. खरं तर राजा मैदानात उतरायला हवा होता, पण राजा बसला होता बंगल्यावर. तेव्हा आमचं सैन्य रस्त्यावर उतरले होतं." असं त्या म्हणाल्या.
 
तसेच २० नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीला विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0