मणिपूरमध्ये सीएपीएफच्या वाढीव तुकड्यांची तैनाती!

13 Nov 2024 18:17:52
CAPF

नवी दिल्ली : मणिपूरमधील ताजे हल्ले आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने २ हजार जवानांचा समावेश असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ( CAPF ) २० कंपन्या राज्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मणिपूरला पाठवल्या जाणाऱ्या २० नवीन सीएपीएफ कंपन्यांपैकी १५ सीआरपीएफच्य आणि पाच तुकड्या बीएसएफच्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यात उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर राज्यात आधीच तैनात केलेल्या सीएपीएफच्या १९८ कंपन्यांमध्ये ही युनिट्स सामील होतील.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, हे सर्व सीएपीएफ युनिट्स ३० नोव्हेंबरपर्यंत मणिपूर सरकारच्या अंतर्गत राहणार आहेत.

Powered By Sangraha 9.0