श्री धिरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नाशकात

13 Nov 2024 15:36:29
Dhirendra maharaj

नाशिक : श्री बागेश्वरधामचे पिठाधीश्वर परमपूज्य श्री धिरेंद्र कृष्ण शास्त्री ( Dhirendra maharaj ) अर्थात श्री. बागेश्वर धाम महाराज गुरूवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी नाशिक पुण्यनगरीत येत असून त्यांच्या उपस्थितीत श्री बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती, नाशिक जिल्हा यांच्यावतीने एकदिवसीय संत सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता तपोवन येथील मोदी मैदानावर होणार आहे. समितीच्यावतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संत सभेत नाशिक आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्र परिसरातील सर्व साधू-संत, महंत, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

श्री शास्त्रीजींच्या मंत्रमुग्ध वाणीतील भक्तिमय प्रवचन, कथा आणि प्रबोधन ऐकण्याची भक्तांना संधी लाभणार आहे. या कार्यक्रमाद्वारे समाजात अध्यात्म, भक्ती आणि संस्कारांचा प्रसार करण्याचा उद्देश आहे. धिरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्यप्रदेशातील बागेश्वरधामचे पिठाधीश्वर आहेत. श्री धिरेंद्र शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाचा लाभ सकल नाशिककरांनी घ्यावा, त्यांचे आशीर्वाद मिळवावेत आणि त्यांच्या भक्तिमय वाणीतून जीवन समृद्ध करण्याचा संकल्प सोडावा, असे आवाहन श्री बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समितीचे प्रदेश संयोजक अभिजीत करंजुले यांच्यासह नाशिक शहर संयोजक सागर शेलार, जिल्हा संयोजक सुनील पवार आणि अंकुश जोशी यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0