मुंबईतून अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हद्दपार करणार : अमित शाह

13 Nov 2024 12:43:08

amit shah
 
बोरीवली : ( Amit Shah )"मुंबईकरांनो, हा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एकेक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून बाहेर काढण्याचे काम भाजप करणार आहे." अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी बोरीवलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत केली आहे.
 
अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यानंतर मुंबईमध्ये सभा घेतली. उत्तर मुंबईमध्ये मनीषा चौधरी, संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, योगेश सागर, विनोद शेलार, प्रकाश सुर्वे या सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमित शाह यांनी बोरिवली येथे ही सभा घेतली. या सभेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयलसुद्धा उपस्थित होते.
 
यावेळी बोलत असताना अमित शाह यांनी कलम ३७० च्या मुद्द्यासह राम मंदिराच्या मुद्द्यापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत टीका केली. तसेच मुंबईतून अवैध बांगलादेशी व रोहिंग्यांना मुंबईतून हद्दपार करण्याचे काम भाजप करणार असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0