नसीम खानच्या प्रचारातून धर्मांधतेचे प्रकटीकरण!

13 Nov 2024 16:25:59

Naseem Khan Chandivali

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Naseem Khan Chandivali News)
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवारांच्या प्रचारालाही चांगलाच जोर धरलेला दिसतो आहे. अशातच काँग्रेस आमदार नसीम खान यांच्या प्रचारातून हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचा प्रकार चांदिवली मतदारसंघात घडला आहे. डोंगरे सदन चाळ, मोहिली व्हिलेज, साकीनाका येथील ही घटना आहे. घरावर असलेल्या गणपती बाप्पाच्या प्रतिमेवर प्राचाराचे स्टिकर लावत काँग्रेसने आपल्या धर्मांधतेचे पुन्हा एकदा प्रकटीकरण यातून केले आहे. सदर प्रकरण बुधवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे उघडकीस आले.

हे वाचलंत का? : छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी १००% टक्के मतदान करा!


'मेरा काम ही, मेरी पहचान है', वोट फॉर मोहम्मद आरिफ नसीम खान, हात बदलेगा हालाथ' अशा प्रकारचे आशय असलेले स्टिकर नसीम खान यांच्या प्रचारार्थ चांदिवली मतदारसंघात दारोदारी लावले जात आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील एका घरावर असलेल्या गणपती बाप्पाच्या प्रतिमेवर स्टिकर लावत हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये काँग्रेसविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे.

Powered By Sangraha 9.0