मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण देणार : प्रकाश आंबेडकर

12 Nov 2024 14:53:25

VBA 
 
मुंबई : ( Prakash Ambedkar )सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लीम बांधवांना जर ५% आरक्षण लागू करून घ्यायचे असेल तर, गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही, असे म्हणत मतदानाचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एक्स या सोशल मीडिया अकांउटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केल्याचे दिसत आहे.
 
प्रकाश आंबेडकरांचे मुस्लीम मतदारांना आवाहन
 
"विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लीम समाज १०% आरक्षण मागतोय, पण ५% आरक्षण हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहे, ते अंमलबजावणी करण्याचं आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला ५% आरक्षण हे जर अंमलबजावणी करुन घ्यायचे असेल तर त्याला काँग्रेसला मतदान देऊन उपयोगात नाही, त्याला शिवसेनेला मतदान देऊन उपयोगात नाही, भारतीय जनता पक्ष अंमलबजावणी करणार नाही एवढं निश्चित आहे. त्या मुसलमानांना मिळालेले ५%आरक्षण हे जर लागू करुन घ्यायचे असेल तर, गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं" असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0