मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP on Donald Trump) बांगलादेशातील हिंदूंकरीता आवाज उठवून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूहिताच्या रक्षणाची शपथ घेतली. त्यांच्या या भूमिकेचे विश्व हिंदू परिषदेने स्वागत केले असून त्यांचे आभार मानले आहेत. आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा पहिल्यांदाच एखाद्या पाश्चात्य देशाच्या नेत्याने मांडला आहे. ते म्हणाले की, इस्लामिक जिहादी शक्तींमुळे बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायातील इतर लोकांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल विहिंपच्या वतीने डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो."
हे वाचलंत का? : हिंदूहिताच्या रक्षणाची डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ!
बन्सल पुढे म्हणाले की, "निषेधाच्या नावाखाली बांगलादेशातील या कट्टरपंथींनी आधी आपल्याच ज्येष्ठ पंतप्रधानांना लक्ष्य केले आणि आता ते आपल्याच राष्ट्रपतींना लक्ष्य करत आहेत. हे सर्व जगासाठी धोकादायक आहे. ज्या देशांमध्ये जिहादींचा हिंसाचार वाढतो, त्या देशांत लोकशाही धोक्यात येते, त्यामुळे लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील सर्व देशांनी अशा जिहादी घटकांवर एकत्रितपणे कारवाई केली पाहिजे."