बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध आणि जनजातींचा नरसंहार

अमेरिकेतील विश्व सम्मेलनात मान्यवरांनी मांडले विचार

    01-Nov-2024
Total Views |

Los_Angeles_Bangladesh_Conference

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (genocide in bangladesh)
बांगलादेशात हिंदू, बौद्ध आणि इतर जनजातींचा नरसंहार होत आहे. या परिस्थितीत आपण शांत बसू शकत नाही. त्यांचा नरसंहार थांबवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही 'केपीसी ग्रुप ऑफ कंपनीज'चे संस्थापक अध्यक्ष काली प्रदीप चौधरी यांनी दिली. नुकत्याच अमेरिकेच्या लॉस एजेलिस येथे झालेल्या 'बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध आणि जनजातींचा नरसंहार' या विषयावर आयोजित विश्व सम्मेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
 
 
हे सम्मेलन ‘हिंदू बौद्ध आणि ख्रिश्चन एकता परिषद’, ‘वर्ल्ड हिंदू फेडरेशन’, ‘ह्युमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ आणि ‘वर्ल्ड बुद्धिस्ट फेडरेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्याल आली होती. अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती हे या परिषदेचे सह-अध्यक्ष होते. स्वामी सुभानंद हे पुरी परिषदेचे समन्वयक तसेच संचालक होते. या सम्मेलनात जगभरातील अनेक संघटनांचे नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाकिस्तानचे धर्मगुरू स्वामी रामनाथ मिश्रा, बांगलादेशचे चिन्मयकृष्ण दास ब्रह्मचारी आणि अमेरिकेचे बिपुलानंद थेरो यांची सम्मेलनाला विशेष उपस्थिती होती.

या परिषदेला अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती, मानवाधिकार अधिवक्ता रिचर्ड एल् बेन्किन, धीमान देव चौधरी, टर्नी अशोक कर्माकर, श्रद्धानंद सीतल, श्यामल मजूमदार, डॉ कांदा स्वामी, आशु मोंगिया, रिचा गौतम, स्वीडनच्या चित्रा पॉल, बांगलादेशी वकील राणा दासगुप्ता फ्रान्सचे दीपन मित्रा आदी वक्त्यांनी संबोधित केले

या परिषदेचे अध्यक्ष अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती, मानवाधिकार अधिवक्ता रिचर्ड एल. बेंकीन, धीमान देव चौधरी, टर्नी अशोक कर्माकर, श्रद्धानंद सीतल, श्यामल मजुमदार, डॉ.कांडा स्वामी, आशू मोंगिया, रिचा गौतम, स्वीडनचे चित्रा पॉल, बांगलादेशचे अधिवक्ता राणा दासगुप्ता, फ्रान्सचे दिपन मित्रा आदी वक्त्यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना प्रत्येकाने बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि अल्पसंख्याकांवर होणारे क्रूर हल्ले, मंदिरे आणि पुतळ्यांची तोडफोड, हिंदू, बौद्ध मुलींचे अपहरण, बलात्कार, तसेच धर्मांतर, घरे जाळणे, मालमत्तेची चोरी आदींबाबत सर्वांनी चर्चा केली. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल जगभरातील हिंदूंना खूप काळजी वाटत असल्याचे ते म्हणाले.