जिलेबीचा गुलीगत धोका

09 Oct 2024 21:59:03

Rahul Gandhi 
 
काय स्वप्न होते? हरियाणामध्ये जिंकलो की तो दिवस ‘जिलेबी दिवस’ म्हणून साजरा करणार! हरियाणामध्ये जिलेबीने धोका दिला. ‘बिग बॉस’मध्ये सुरज म्हणतो ना, ‘गुलीगत धोका’. अगदी तसाच धोका हरियाणावाल्यांनी दिला. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ‘लाडकी बहीण योजने’बद्दल काहीतरी खोटे पसरवले पाहिजे. काम न करता सहानुभूती मिळवायला पाहिजे.
 
काय स्वप्न होते? हरियाणामध्ये जिंकलो की तो दिवस ‘जिलेबी दिवस’ म्हणून साजरा करणार! हरियाणामध्ये जिलेबीने धोका दिला. ‘बिग बॉस’मध्ये सुरज म्हणतो ना, ‘गुलीगत धोका’. अगदी तसाच धोका हरियाणावाल्यांनी दिला. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ‘लाडकी बहीण योजने’बद्दल काहीतरी खोटे पसरवले पाहिजे. काम न करता सहानुभूती मिळवायला पाहिजे. काय म्हणता, महाराष्ट्रात ओल्ड मॅन पवार अंकल आणि उबाठा हे सहानुभूतीचे लाभार्थी आहेत? अरे हो, विसरलोच मी. पवार पावसात भिजले आणि उबाठांना कंटाळून त्यांचे ४० आमदार स्वतःहून सोडून गेले, तरीही त्याचे खापर त्यांनी ‘कमळ’वाल्यांवर फोडले. त्यामुळे महाराष्ट्रातले लोक मस्त फसले. मलाही काहीतरी केले पाहिजे. मी ना महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी ‘खिपा जोडो यात्रा’ काढीन . पवारांचे ट्रेडिशनल मतदार आणि उबाठांचे नवे मतदारम्हणजे आपले लाडके बहुसंख्य मुस्लीम मतदार हो यांना खिमा खायला आवडतो, तर खिपातला ‘खि’ म्हणजे खिमा. उबाठा दादाचे जुने मतदार वडापावची चर्चा करायचे. पण ते गेले शिंदेंकडे. त्या वडापावमधला पाव म्हणून ‘पा’ घेतला. पण ‘पा’ म्हणजे त्यांना पाव वाटला, तरी आपण त्या ‘पा’ला पास्ता समजायचे. कारण, मला तर नानीच्या घरचा पास्ता आवडतो. मला आवडतो म्हणजे कोणत्या कॉग्रेसीची बिशाद आहे का, पास्ता आवडत नाही म्हणायची? तर तो चलो भैया, महाराष्ट्र मे ‘खिपा जोडो यात्रा’ निकालेंगे. तसेही महाराष्ट्रातले लोक जास्त विचार करत असतील का? बघ ना, कोरोना काळात आपली, उबाठाची आणि श. पवार गटाची मिळून सत्ता होती, तेव्हा महाराष्ट्रात हाहाकार माजला होता, पण तेव्हा लोक काहीही बोलले नाहीत.
 
याउलट, लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार असे आपण लोकांना खोटेच सांगितले, लोकांनी आपल्या खोटारडेपणावर विश्वास ठेवलाच ना? आपल्याला, उबाठा आणि श. पवार गटाला चांगल्या जागा मिळाल्या. दुसरीकडे भाजपवाल्यांनी कितीही चांगले काम केले आणि त्याविरोधात आपण महाराष्ट्रातल्या लोकांना खोटेनाटे सांगितले, तरी लोक विश्वास ठेवतात. याला भोळेपणा म्हणावा की मूर्खपणा? काय म्हणता? महाराष्ट्र भोळा आहे, पण मूर्ख नाही? महाराष्ट्र एकवेळ फसला, आता दुसर्‍यांदा नाही? म्हणजे हरियाणासारखेच ‘कमळ’ फुलणार? महाविकास आघाडीला महाराष्ट्रात गुलीगत धोका मिळणार!
 
फसलेला डाव
 
मेहनत, कष्ट आणि त्याग करणार्‍या व्यक्तीला त्याच्या त्याग, कष्टाचे विपरित फळ मिळाले, तर म्हटले जाते ‘हेच फळ काय मम तपाला?’ पण, हेच वाक्य विनेश फोगट संदर्भात वापरू शकतो का? काँग्रेसची सत्ता हरियाणात आल्यावर मग आपणही सत्तेची फळे चाखू, असे वाटून विनेशने काँग्रेसचा हात पकडला. पण काँग्रेसशी हातमिळवणी करण्याआधीची विनेशची कारकीर्द पाहिली, तर काय दिसते?
 
लैंगिक शोषणाचे आरोप करत विनेश आंदोलन करू लागली. अर्थात, तिच्या आरोपाबाबत काय खरे काय? खोट काय? हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचाच. पण विनेशच्या या आंदोलनाच्या आडून काही लोकांनी, आणि त्यामागे तिनेही थेट भाजप आणि त्यातही केंद्र सरकार त्यातही मोदींना लक्ष्य करायला सुरुवात केली. जणू विनेशचे आंदोलन मोदींविरोधात ,भारतीय प्रशासन आणि सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळेर असेच वातावरण तयार झाले. तेव्हाच खरे तर राजकीय अभ्यासकांना चाहुल लागली होती की, या आंदोलनातली नेते मंडळी पुढे जाऊन काय करण्याच्या तयारीत आहेत. कारण, अण्णा हजारेंचे भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनाचे फलित काय झाले, हे देशाने पाहिले होते. त्या आंदोलनाचे उत्पादन म्हणजे अरविंद केजरीवाल होय. अण्णांच्या आंदोलनाचा वापर करत, केजरीवालांनी दिल्लीची सत्ता बळकावली. आता हेच केजरीवाल दारू घोटाळ्यात अडकले, ही गोष्ट सोडा. पण त्यामुळे आंदोलन-बिंदोलन केले की नेता बनतो, असे अनेक लेाकांना वाटू लागले. या अनुषंगाने लैंगिक अत्याचाराविरोधात आंदोलन करून आपण नेता बनू शकतो, असे स्वप्न विनेशला पडले असेल का? आपल्याकडेही सुरू असलेले सगेसोयरे आंदोलन याच धाटणीतले असेल का? असो. तर विनेश काँग्रेसमध्ये गेली. तिने तिकीटही मिळवले, खाप पंचायत आणि जातीचे समीकरण वगैरे वगैरे करत ती जिंकलीही. पण ती जिंकली असली, तरी हरियाणामध्ये सत्तेत यायचे तिचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. तसेच, विनेश सारख्या कुस्तीपटूला पक्षात घेऊन हरियाणाच्या जाट समाजाचे एकगठ्ठा मत मिळवायचे, हा काँग्रेसच्या अलाकमांडचा डावही त्यांच्यावरच उलटला. शेवटी काय? जैसे ज्याचे कर्म!
Powered By Sangraha 9.0