मराठमोळ्या लेखकाने लिहिली रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची कथा

    08-Oct-2024
Total Views |

singham again  
 
 
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिंघम ३ नंतर त्याच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर सिंघम अगेनचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का 'सिंघम अगेन' ची कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे.
 
'सिंघम अगेन' चित्रपटाबद्दल क्षितीजने पोस्ट केली आहे. “मुंबईत आल्यानंतर पाहिलेला पहिला हिंदी सिनेमा सिंघम. आज कथा आणि पटकथा लेखक म्हणून आलेला पहिला हिंदी सिनेमा सिंघम अगेन. घरच्यांसारखी काळजी घेणाऱ्या रोहित सर आणि त्यांची सोन्यासारखी टीम यांना, माझ्या सर्व सहकारी लेखकांना आणि मला तिथपर्यंत पोहोचायला मदत करणाऱ्या मिखील आणि करण यांना, तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं”.
 

singham again  
 
दरम्यान, सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर अशी भली मोठी कलाकारांची फौज आहे. याशिवाय, हिंदी कलाकारांच्या गर्दीत मराठमोळा अभिनेता अंकित मोहनदेखील झळकला आहे. 'सिंघम अगेन' चित्रपट देशभरा १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.