'जय भोले' म्हणाला म्हणूल इस्लामिक कट्टरपंथींचा हिंदू युवकावर हल्ला!

08 Oct 2024 18:02:49

Jalgaon News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jalgaon Hindu Boy)
एका हिंदू युवकास इस्लामिक कट्टरपंथींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जळगाव येथे घडला आहे. मंगळवार, दि. ०८ ऑक्टोबर रोजी या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मित्राला केवळ 'जय भोले' बोलल्यामुळे इस्लामिक कट्टरपंथींच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी जय सोनावणे या हिंदू युवकास जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे.

हे वाचलंत का? : राष्ट्रध्वजाला पतंग बनवत अल्पवयीन कट्टरपंथीयांकडून अवमान

जळगावच्या तांबापूरा भागात जय सोनावणे आपल्या एका मित्रासह तहान लागली म्हणून पाण्याची बाटली घेण्यास थांबला होता. तेव्हा त्याला त्याच्या एका मित्राचा फोन आला. तेव्हा मित्राशी बोलताना तो केवळ 'जय भोले' इतकंच म्हणाला. तेव्हा जवळच असलेल्या काही इस्लामिक कट्टरपंथींनी 'तु जय भोले का म्हणलास?' असे म्हणत त्याला मारहाण केली. जय सोनावणे याच्या माहितीनुसार सुरुवातीला चार जण होते त्यानंतर चारचे चाळीस झाले. या हल्ल्यात जय याच्या डोळ्याजवळ खोल जखम झाली असून तो न्यायासाठी मागणी करत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0