27 गावातील नागरिकांना पाणी प्रश्नावर लवकरच मिळणार दिलासा

08 Oct 2024 17:44:53

raju patil pahani doura
 
 
 
 
डोंबिवली : अमृत योजनेच्या कामात अनेक अडचणी आल्या. अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचे काम केले गेले. टाक्यांच्या जागा निश्चित केल्या गेल्या नाहीत. ज्या जागा निश्चित केल्या होत्या. त्या जागा आपल्या ताब्यात नव्हत्या. पण आता समाधानकारक परिस्थिती दिसते आहे. लवकरच अमृत योजना कार्यान्वित होईल असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामाच्या पाहणी दौरा दरम्यान केले.
कल्याण ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र या कामात दिरंगाई होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी योजनेच्या कामावर प्रश्न उपस्थित करीत ही कामे जलद गतीने पार पाडली जावीत यासाठी पाठपुरावा केला आहे. आमदार राजू पाटील यांनी बुधवारी अधिकारी वर्गासोबत सुरू असलेल्या योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सध्या सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. अमृत योजनेचे काम संथ गतीने सुरू होते. पण आता ज्या प्रकारे कामे सुरू आहेत ते पाहता एप्रिल अखेरपर्यंत ही योजना कार्यान्वीत होईल असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला.
चौकट- हरियाणातील भाजपाची जादू महाराष्ट्रात चालणार का?
मनसे आमदार राजू पाटील यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील निवडणूक निकालावर भाष्य केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये निकाल अपेक्षित होता. पण हरियाणात भाजपाने काय जादू केली माहिती नाही. त्यांची ही जादू महाराष्ट्रात चालते का हे पाहावे लागणार आहे.
--------------------------------------------------------------
Powered By Sangraha 9.0