Singham Again चित्रपटाचं रामायणाशी विशेष कनेक्शन! मल्टीस्टारर 'सिंघम'चा ट्रेलर प्रदर्शित
07-Oct-2024
Total Views |
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युनिवर्समधील पहिली लेडी कॉप अर्थात दीपिका पडूकोणही झळकणार आहे.
‘सिंघम अगेन’चा ट्रेलर रामायणाच्या कथानकावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये रावणानं सीतेचं अपहरण केल्यासारखं चित्रपटातील खलनायक म्हणजेच अभिनेता अर्जून कपूर करीना कपूरचं अपहरण करतो. अजय देवगण करीना कपूरला वाचविण्यासाठी श्रीलंकेला जातो, असं ट्रेलरमध्ये दिसतं. या ट्रेलरमध्ये रामायणातील पात्र आणि प्रसंग चित्रपटात घडणाऱ्या प्रसंगाशी जोडण्यात आली आहेत. यात प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमान यांच्याशी रणवीर सिंगचे पात्र मिळते जुळते आहे तर लक्ष्मण यांच्याशी टायगर श्रॉफचे पात्र मिळते जुळते आहे. तसेच, मुख्य खलनायकांच्या भूमिकेत अर्जुन कपूर सोबत जॅकी श्रॉफ देखील आहेत.
दरम्यान, ५ मिनिटांचा ट्रेलर जसजसा पुढे जातो, तशी एकेक पात्रं समोर येतात. ‘लेडी सिंघम’ शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पदुकोण रावडी लूकमध्ये डायलॉग बोलताना दिसणार आहे. टायगर श्रॉफसुद्धा अनेक स्टंट्स करीत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करीत आहे.
रणवीर सिंगनं साकारलेलं ‘सिंबा’ हे पात्रदेखील ‘सिंघम’मध्ये असणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. शिवाय चित्रपटात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रॅण्ड एन्ट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे यंदाही प्रेक्षकांची दिवाळी रोहित शेट्टी धमाकेदार करणार यात शंकाच नाही.