राष्ट्रध्वजाला पतंग बनवत अल्पवयीन कट्टरपंथीयांकडून अवमान

07 Oct 2024 12:04:37

National flag contempt
 
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे दानिलिमडा ठिकाणी शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी कट्टरपंथी अल्पवयीन मुलांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला. याप्रकरणात आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी राष्ट्रध्वजाचा वापर पतंग बनवण्यासाठी केला असल्याचा दावा उपस्थितांनी केला आहे. याप्रकरणात दोघांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला. 
 
गुजरात येथील अहमदाबादच्या दानिलिमडा येथे शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी काही कट्टरपंथी समाजातील दोन अल्पवयीन मुलांना राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी त्याला राष्ट्रध्वजाच्या कापडाचा पतंग घेऊन जाताना पकडले. पोलिसांनी या दोघांविरूद्ध एफआरआय दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
 
तक्रारीत म्हटले की, ते रात्री दानिलिमडा परिसरातून जात असताना पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कूटरवर दोन व्यक्ती त्यांना दिसल्या. पतंगाप्रमाणे राष्ट्रध्वज बांधल्याचे त्यांनी पाहिले. चौकशी केली असता दोघेही घटनास्थळावरून पळून निघून गेले होते. मात्र पाठलाग केल्यावर घटनास्थळापासून काही अंतरावर पडले होते. त्यावेळी त्याने पडलेली वस्तू घेतली त्यावेळी तक्रारदाराने दोघांनाही पकडले होते. त्यावेळी पॅकेटची तपासणी करण्यात आली असता त्यात एक दोन नाही तर तब्बल आठ राष्ट्रध्वज एकत्र शिवलेले आढळले. त्यानंतर तक्रारदाराने ते झेंडे काढून टाकले. यावेळी इतर कोणतेही कपडे भेटले नसल्याचे मुलांना सांगितले आणि त्यांनी राष्ट्रध्वजाचा आवमान केला.
 
स्थानिक सूत्रांकडून याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली दोन मुस्लिम अल्पवयीन मुलांना पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर स्थानिक एमआयएम आणि काँग्रेस नेतेही पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी पोलिसांनी वेळीच तक्रार दाखल केल्याने अनुचित प्रकार टळला असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0