मुंबई : मुंबईत कंत्राटदार वॉर सुरु करणारा आदिपुरुष म्हणजे आदित्य ठाकरे आहेत, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तुम्ही मुंबईच्या विकासाला खिळ घालू पाहात आहात का? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार म्हणाले की, "आदित्यजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाने टेंडर कंडिशनचा व्यवहार केला. तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना त्यांनी टेंडरच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला. पण आता टक्का वाढवण्यासाठी दबावतंत्र वापरून तुम्ही मुंबईच्या विकासाला खिळ घालू पाहात आहात का? अदानीला टेंडर मिळण्याची पायाभरणी उबाठा गटाने केली," असा आरोप त्यांनी केला.
हे वाचलंत का? - "महाराष्ट्राची सर्कस झालीये! कुणी विदुषकी चाळे करतं, तर कुणी..."; राज ठाकरेंची टीका
ते पुढे म्हणाले की, "महानगरपालिकेत दोन प्रकारचे कंत्राटदार काम करत आहेत. एक आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आणि दुसरे मेरिटवर आलेले पूर्ण देशभरातले. त्यामुळे आपल्या जवळच्या कंत्राटदारांना काम मिळत नाही हे आदित्य ठाकरेंचं दु:ख आहे. मुंबई शहरात २०१४ पासून आतापर्यंत धरण झालं नाही. मुंबईत कंत्राटदार वॉर सुरु करणारा आदिपुरुष म्हणजे आदित्य ठाकरे आहे. राज्याच्या विकासासाठी जे जे केलं जाईल त्याच्या आड येणारे लोकं महाविकास आघाडीचे आहेत. कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, अंडरग्राऊंड मेट्रो या सगळ्या प्रकल्पाच्या ते विरोधात आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.