मुंबई : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करणार असून भाऊबीजेनिमित्त त्यांना २००० रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
आदिती तटकरे म्हणाल्या की, "महाराष्ट्रातील आपल्या अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे, गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने नुकतेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे."
हे वाचलंत का? - मुंबईत कंत्राटदार वॉर सुरु करणारा आदिपुरुष म्हणजे आदित्य ठाकरे! आशिष शेलारांचा घणाघात
"यासोबतच बहिण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीजेच्या उत्सवानिमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना २००० रुपये भाऊबीजेची ओवाळणी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. यासाठी ४० कोटी १२ लाख ५० हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.