लुधियाना : पंजाब येथील लुधियानाच्या आदर्श पब्लिक स्कूल या शाळेस अज्ञात व्यक्तींकडून बॉम्बने उडवण्याची (Bomb Blast) धमकी देण्यात आली आहे. ही धमकी शाळा व्यवस्थापनाला एका ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. ही घटना ५ ऑक्टोबरची असून ईमेलद्वारे सकाळी शाळेत बॉम्बस्फोट केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र धमकी देणारा दुसरा तिसरा कोणीही नसून आदर्श शाळेचा अल्पवयीन विद्यार्थी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचे कारण ऐकून थक्क व्हाल.
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी घडली आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांनी त्यांचा ईमेल तापासताना धमकीचे मेल आले होते. त्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाशी संबंधित मेलबाबत चर्चा केली. त्यांनी शाळेला सुट्टी जाहीर केली. पोलिसांना या धमकीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस ठाणे घटनेस्थळी पोहोचले.
यावेळी पोलिसांनी या धमकीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याने शाळेला सुट्टी मिळावी यासाठी हा उपद्रव केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली