राज्य सरकारचा मोठा निर्णय! ३ ऑक्टोबर हा 'मराठी अभिजात भाषा दिन' म्हणून साजरा करणार

04 Oct 2024 13:41:11
 
Image
 
मुंबई : ३ ऑक्टोबर हा दिवस 'मराठी अभिजात भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्य सरकारने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
 
हे वाचलंत का? -  नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी! विविध मागण्यांसाठी आदिवासी आमदार आक्रमक
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने महाराष्ट्राचे आणि जगभरातील मराठीजनांचे अभिनंदन केले. तसेच जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव यावेळी करण्यात आला.दरम्यान, ३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0