एक देश एक कायदा! मोदींनी पुन्हा दिले समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत

31 Oct 2024 17:30:49

modi ucc
 
गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवर जोर देत भारताच्या या गुणविशेषांचा गौरव केला. भारत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला वंदन पंतप्रधान मोदी यांनी वंदन केले. त्याच बरोबर, भारत देश एक देश एक निवडणूक या संकल्पनेकडे वाटचाल करीत आहे जेणेकरून, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेता येतील.

याच सोबत, मोदी म्हणाले की भारत आता एका समान नागरी कायद्याकडे वाटचाल करत आहे. उत्तराखंडमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या राज्य विधानसभेत एकसमान नागरी संहिता पास केली. ऐतिहासिकदृष्ट्या, काही विशिष्ठ मतदारांच्या प्रतिक्रियेच्या भीतीने एकामागून एक आलेल्या सरकारांनी या धर्म-आधारित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे टाळले होते.

सरदार पटेलांचा वारसा जतन करूया
मागच्या दशकभरातील वाटचालीवर भाष्य करताना मोदी म्हणाले की, " राष्ट्रीय एकात्मतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरदार पटेल यांचा भारदास्त आवाज, स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळील हा भव्य असा कार्यक्रम, त्यात होणारे सादरीकरण हे सगळं म्हणजे भारताचेच दर्शन आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या प्रमाणेच एकता दिवस सुद्धा दिमाखात साजरा केला गेला पाहिजे. आज सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीची सुरूवात होत आहे. आपण हा उत्सव पुढची २ वर्ष साजरा करणार आहोत. त्यांत्या असामान्य कारकीर्दीला वाहिलेली ही श्रद्धांजली असेल. ज्या वेळेस भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काही जणांना वाटत होते की देशाचे तुकडे पडतील परंतु सरदार पटेल यांनी मात्र तसे होऊ दिले नाही."


 
Powered By Sangraha 9.0