वॉशिंग्टन डीसी : अमेरीकेत आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या तारखा जवळ येऊ लागल्या आहे. अशातच कमला हॅरीस आणि डॉन्लाड ट्रम्प यांच्यामधील स्पर्धा अधिक तीव्र होऊ लागली आहे. अशातच एकमेकांवर कुरघोडी कराणारी विधानं, भाषणं यांचे पेव फुटले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी जेव्हा ट्रम्प समर्थकांना 'गारबेज' अशी उपमा दिली, त्यानंतर ट्रम्प यांनी थेट गारबेज ट्रक चालवत बायडन यांना काटशाह दिला आहे.
"माझी गारबेज ट्रक तुम्हाला कशी वाटली? हे कमला आणि जो बिडन यांच्यासाठी" असे म्हणत ट्रम्प यांनी दोघांची खिल्ली उडवली आहे. आपल्या गारबेज ट्रक मध्ये बसून ट्रम्प यांनी पत्रकारांना मुलाखात सुद्धा दिली. ट्रम्प यांच्या मॅडीसन स्कवेअर रॅलीला उपस्थितत राहिलेल्या ट्रम्प यांच्या समर्थकांना गारबेज अशी उपमा देत जो बायडन यांनी त्यांचा अपमान केला गेला होता. बिडन हे केवळ पुरतो रिको इथल्या नागरिकांचा अपमान केला नसून, संपूर्ण अमेरीकाचा अपमान केला आहे असे काही जणांचे म्हणणे आहे. या मधून एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कमला हॅरीस या अमेरीकेतील लोकांसाठी पात्र उमेदवार अद्याप नाही. असे मत काही ट्रम्प समर्थकांनी मांडले आहे. आपल्या भाषणादरम्यान, ट्रम्प यांनी म्हटले की " कमला हॅरीस या कालपर्यंत आपल्या राजकीय विरोधकांची तुलना गुन्हेगारांशी करत होत्या, आता मात्र त्या सुबंध अमेरीकेतील लोकांना कचरा म्हणत आहेत."