मुंबई : काँग्रेसचे माजी नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे आता काँग्रेस नेते रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत गुरूवारी ३१ ऑक्टोबर रोजी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपला बळकटी मिळाली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांना काँग्रसने तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. ते सायन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने रवी राजा नाराज झाले आहेत.
काँग्रेसने कामाची पोचपावती न दिल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान भजपात प्रवेश केल्यानंतर रवी राजा यांनी कोणतीही एक अट ठेवली नाही. त्यांनी भाजपात निस्वार्थ पक्षप्रवेश केला आहे. रवी राजा यांना काँग्रेसमधून तिकीट न दिल्याने स्थानिक मतदारवर्गात असंतोष निर्माण आहे. याचा विपरित परिणाम हा सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश यादव यांच्या मतांवर परिणाम होण्याची चिंता आता काँग्रेसला सतावत आहे.