जालना : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरल्याची मुदत संपली असून मैदानात कुणाचे किती उमेदवार आहे यांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. अशातच आता दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विविध धर्मगुरूंशी गुरूवारी चर्चा करणार आहेत. यामुळे मनोज जरांगेंच्या या चर्चेत नेमकं काय बोलणार हे महत्त्वाचे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याची मुदक संपताच मनोज जरांगे पाटील हे सक्रीय झालेले दिसत आहेत. गुरूवारी आणि बौद्ध धर्मगुरूंसोबत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचे समीकरण जुळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी ही बैठक मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जद यांच्यासोबत होणार असल्याची माहिती आहे.
मुस्लिम, बौद्ध धर्मगुरूंशी ही बैठक होईल. मराठा, वंचित आणि मुस्लिम समाजाचं समीकरण जुळवण्यासाठी जरांगे पाटील यांचा प्रयत्न असल्याचं सांगितले जात आहे. तसेच मनोज जरांगे पाटील येत्या २ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपले उमेदवार उभे करायचे की नाही असे आवाहन त्यांनी केले आहे.