मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत २० नोव्होबर रोजी पुन्हा दिवाळी साजरी होणार असल्याचे भाष्य केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. महायुती, महाविकास आघडी आणि तिसऱ्या आघाडीत लढत होणार आहे. याचपार्श्वभूमीवर येत्या २० नोव्हेबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.
भाजपने १५२ जणांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अद्यापही जागांचा तिढा जरी सुटला नसला तरीही आता मोहित कंबोज यांनी महाराष्ट्रात भाजपचाच विजय होणार असल्याचे सांगितले आहे. ११० ते ११५ जागा मिळणार असल्याचा मोठा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांनी आपल्या एक्स ट्विटरवर या संदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यालयात पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे. निवडणकीआधीच मोहित कंबोज यांनी मोठं भाकीत केले आहे. यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. १५२ पैकी भाजप ११० ते १११० जागा जिंकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला विकासाचा स्पष्ट जनादेश देण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंबोज यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून महाराष्ट्र भाजपला पाठिंबा दिला आहे.