'जय हनुमान'मध्ये ऋषभ शेट्टी दिसणार बजरंग बलीच्या अवतारात

31 Oct 2024 11:44:08
 
jai hanuman
 
 
मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने अनेक नव्या चित्रपटांच्या घोषणा केल्या जात आहेत. अशात प्रशांत वर्मा यांच्या बहुप्रतिक्षित 'जय हनुमान' चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला असून तो हनुमानाच्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. महत्वाचे म्हणजे त्याच्या या लूकला चाहत्यांची विशेष पसंती मिळता आहे.
'जय हनुमान' चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस मिथ्री ऑफिशियलने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे एक अप्रतिम पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये ऋषभ शेट्टी भगवे कपडे परिधान करून रामाची मूर्ती छातीजवळ धरून बसलेला दिसत आहे. बजरंगी बली अवतारात ऋषभ शेट्टीला पाहून चाहते कौतुक करत आहेत.
 
ऋषभ शेट्टीच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत कौतुकांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अदा शर्मानेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले आहे की, पवनपुत्र हनुमान की जय.
 

jai hanuman 
 
'हनुमान'नंतर प्रशांत वर्मा घेऊन येत आहेत 'जय हनुमान'. 'जय हनुमान' हा प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा महत्त्वाचा चित्रपट आहे. 'हनुमान' चित्रपटाने मिळवलेल्या यशानंतर आता सर्वांच्या नजरा 'जय हनुमान'कडे लागल्या आहेत. 'जय हनुमान' या चित्रपटातून सर्वात पवित्र आणि लोकप्रिय पौराणिक सुपरहिरोला जिवंत करणार आहे.
Powered By Sangraha 9.0