इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

31 Oct 2024 15:38:08

ISKCON Chinmay Das

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ISKCON Chinmay Das) 
ऐन दिवाळीत बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे नवे उदाहरण समोर आले आहे. चितगाव येथील इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांच्यावर बुधवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह अन्य १९ संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
चितगाव येथे दि. २५ ऑक्टोबर रोजी एका रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप चिन्मय दास ब्रह्मचारी यांच्यावर आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाच्या वर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकवण्यात आल्याचा आरोप चितगाव पोलिसांनी केला आहे. चिन्मय दास हे बांगलादेशातील इस्कॉन ट्रस्टचे सचिव असून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर नव्हे तर चंद्र-तारे असलेल्या ध्वजावर भगवा ध्वज फडकवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या संयुक्त राष्ट्र संघटनेनेही बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशातील निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्येची चौकशी करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केले आहे.
Powered By Sangraha 9.0