उत्तराखंड : दिवाळीआधी उत्तराखंडमधील हरिद्वारमधील मोतीचूर रेल्वे स्थानकाजवळ हरिद्वार-डेहराडून रेल्वे रुळावर एक डिटोनेटर सापडले होता. मात्र आता एका संस्थेने त्या डिटोनेटरल ताब्यात घेत दजप्त केले. याप्रकरणी आता उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने रेल्वे रुळावर डिटोनेटर ठेवल्याचा संशय आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हरिद्वार जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक सरिता डोवाल यांनी सांगितले की. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणी आधारे अशोक कुमार नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो रेल्वे रुळावर जात होता. यामुळे पोलिसांनी संबंधित आरोपीवर कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या प्रसारमाध्यमाच्या माहितीनुसार, आरोपी हा रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम करत होता. तो खाजगी मजूर म्हणून आपली भूमिका बजावत होता. दरम्यान लोकोपायलेटला त्याला एका बोगद्याठिकाणी असलेला डिटोनेटर दिसून आला होता. ज्याचा ट्रेन थांबण्यासाठी उपयोग केला जातो. ट्रेन थांबवण्यासाठी डिटोनेटर हे रेल्वे रुळावर ठेवण्यात आले होते, अशी माहिती सांगण्यात आली आहे.