मुंबई : नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानिमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, मराठी विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव आणि अमेरिकेतील मराठी कल्चर अँड फेस्टिवल्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठी अभिजात भाषा, चला ज्ञानभाषा करूया’ असा या लेख स्पर्धेचा विषय आहे. या स्पर्धेसाठी लेखमर्यादा २००० शब्द आहे. इच्छुक स्पर्धकांनी chalval1949@gmail.Com या मेल आयडीवर किंवा ९३२३११७७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम आणि इतरांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. या स्पर्धेसाठी लेख पाठविण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.