ठाण्यात भरणार कोकण महोत्सव!

    30-Oct-2024
Total Views |


कोकण महोत्सव 
ठाणे : ठाण्यातील सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ आणि दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकरनगर येथे सतराव्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३ नोंव्हेबर ते १० नोंव्हेबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
 
कोकणातील दशावतार, कोकानरत्न पुरस्कार, भजन, शक्तीतुरा, लोकगीतांचा कार्यक्रम, खेळ पैठणीचा, गुणवंत विद्यार्थी सत्कार असे विविध कार्यक्रम या महोत्सवात पार पडणार आहेत. सोबतच या महोत्सवात अनेक स्टॉल्स लागणार आहे. त्या स्टॉल्सवर कोकणी मसाले, सुका मेवा, मासे, अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण, खडखडे लाडू असे अनेक पदार्थ विक्रीसाठी असणार आहेत.
 
महोत्सवाच्या ठिकाणी मालवण तालुक्यातील साळेल-नांगरभट गावातील श्री गिरोबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे हे सतरावे वर्ष आहे. दरवर्षी अनेक कोकणवासीयांच्या, कोकणप्रेमींच्या कलााकारांच्या आणि उपस्थितीत हा महोत्सव पार पडतो.