दिवाळी साजरी करण्यावरून हिंदू महिलांना जिहाद्यांची शिवीगाळ

30 Oct 2024 15:55:32

Taloja News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Taloja Jihadi News)
दिवाळी साजरी करण्यावरून दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना नवी मुंबईत घडल्याचे निदर्शनास आले आहे. तळोजा सेक्टर ९ मधील पंचानंद सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला आहे. विशिष्ट समुदायाच्या सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी आणि इमारतीच्या आजूबाजूच्या रस्त्यावर दिवाळीनिमित्त सजावट करण्यास आक्षेप घेतला आहे. यावेळी हिंदू महिलांना धमक्या आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे सोशल मिडियावरून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून दिसत आहे.

हे वाचलंत का? : मीरा रोडमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर धर्मांधांचा 'चाकू'हल्ला!


सदर व्हिडिओमध्ये असे दिसते की, धर्मांध पुरुषांचा एक गट महिलांना दिवाळी साजरी करण्यावरून धमकावत आहे आणि महिलांनी केलेल्या सजावटीला विरोध करत आहेत. हा वाद जून महिन्यातील एका घटनेवरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा हिंदू कुटुंबांनी बकरी ईदच्या दिवशी सोसायटीत बकरा कापण्यास विरोध दर्शविला होता. बकरी ईदला झालेल्या या आक्षेपानंतर आता मुस्लीम सदस्यांनी दिवाळीच्या रोषणाईला विरोध केला आहे.
Powered By Sangraha 9.0